Saturday, August 29, 2026
HomeBreaking Newsराजूर ग्रामपंचायत प्रशासन आता तरी जागे व्हा ना हो.....!

राजूर ग्रामपंचायत प्रशासन आता तरी जागे व्हा ना हो…..!

•राजूर ग्रामपंचायतन प्रशासन आता तरी जागे व्हा ना हो.....! राजूर ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.

Ajay Kandewar,Wani : राजूर परिसरातील अनेक गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. हे खरूजसदृृृृश जखमांनी माखलेले मोकाट कुत्रे गावातील परिसरात सैरावैरा फिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याआधीच चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या घटनेचा सार घेऊन या मोकाट आणि घातक कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी होत आहे.

राजूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच राजूरगावसह परिसरात मोकाट कुत्र्यांच्या अंगावरील केस गळती होऊन संपूर्ण अंगावर जखमा झाल्याचे आढळून येत आहे. जखमांनी माखलेले हे मोकाट कुत्रे परिसरात सैरावैरा धावत असताना अनेक नागरिकांच्या घरामध्ये प्रवेश करतात. कुत्र्यांच्या अंगावरील जखमांमधून रक्तस्त्राव होत असल्याने सर्वत्र दुर्गधी पसरत आहे. चर्मरोगाची लागण झालेल्या कुत्र्यांपासून वयोवृद्ध लोकांना व लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या या संसर्गापासून परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात येण्याची चिंता सध्या नागरिकात वाढली आहे. या बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने अशा कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page