Ajay Kandewar,Wani :- शहरात गोमांसाची विक्री होण्याचा प्रकार समोर आला असुन दि.11 रोज शनिवारी सायंकाळच्या सुमारास वणी येथील जत्रा मैदान परिसरात गोवंश जनावरांची मुंडके (शिर) व मोठ्या प्रमाणात अवयव आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. आता दि.14 जाने रोजी लालपुलिया परिसरातील “आफताब बिर्याणी सेंटर व के जी एन बिर्याणी सेंटर” मध्ये 40 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे.
लालपुलिया परिसरात आफताब बिरयानी सेंटर व के जी एन बिर्याणी सेंटर चिखलगाव वणी येथे असुन दि. 14 रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान गोवंशाचे अवैद्य कत्तल करुन अवैधरीत्या गोमासची बिरयानी करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती विश्व हिंदु परिषद तथा बजरंग दल वणी च्या कार्यकर्त्यांना मिळल्यावरून याबाबतची माहिती वणी पोलीसांना देण्यात आली. दोन्ही दुकाणाची तपासणी करण्यात आली. दरम्यान के जी एन बिर्याणी सेंटर येथे 5 किलो गोमास आढळले. तर दुसऱ्या आफताब बिर्याणी सेंटर येथे 35 किलो गोमांस आढळल्याने सदर गोमांस पोलीसांनी जप्त केले. यावेळी ही कारवाई SDPO यांचा मार्गदर्शनात वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार P.I अनिल बेहरानी,API गुल्हाने,PSI अपसुंदे , शिपाई शुभम सोनुले यांनी पार पाडली.
“दोन्ही दुकाणाचे मालक सैय्यद इमरान सैय्यद ईस्माइल (42) रा. एकतानगर, एफाज खान इब्राहीम खान (41) रा. शमीम लेआउट चिखलगाव त्यांना गोवंशाचे मास पुरविनारे पाशा कुरेशी रा. मोमीनपुरा वणी यांचे विरुध्द कार्यावाही करण्यात यावी अशा दोन विविध लेखी तक्रारी रोहन पारखी व शुभम गोरे यांनी वणी पोलिसांत दाखल केल्या आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.”