Monday, April 27, 2026
HomeBreaking Newsप्रशासकीय यंत्रणेला "विलास आणि पार्टनर"जुमानेना....

प्रशासकीय यंत्रणेला “विलास आणि पार्टनर”जुमानेना….

•नेरड,पुरड,कुंड्रा,चिलई,तेजापुर व आमलोन येथील रेती चोरट्यांना अभय कुणाचे? •थातुरमातुर कारवाया करुन शासनाची दिशाभूल?

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील विदर्भा नदीपात्रातून नेरड,पुरड,कुंड्रा,चिलई,तेजापुर व आमलोन गावातील रेती चोरटे मस्त डाव मारीत महसूल बुडवीत काहीं निष्क्रीय अधिकाऱ्यांचा मदतीने शासनाचा तिजोरीला चुना लावत आहे. या गावातील रेती चोरट्यात अव्वल शिरजोरी करणारा तो “विलास” यावर मात्र ते “निष्क्रीय अधिकारी” दिलखुलास मैत्री असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

विदर्भा नदीपात्रातून रेती तस्करी करणाऱ्यांचे जवळपास 3 ते 4 गट पडल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्या तस्करांमधील”विलास “हा “काहीं निष्क्रीय अधिकाऱ्यांशी” आर्थिक साटेलोटे करून आपली पोळी शेकण्याचे काम करीत असल्याची चर्चा सध्या गावात रंगत आहे. हा नेमका विलास कोण? नदीपात्रातून रात्रदिवस ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतूक होत असते माञ “त्या ” काहीं अधिकाऱ्यांची रेती चोरट्यांवर विशेष मेहरबानी असेल यातही शंका निर्माण झाली आहे अशी देखील खमंग चर्चा रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page