Monday, August 24, 2026
HomeUncategorizedमुकुटबनात दोन धंदे बंद, लाडका "नू**र’ मात्र सुरूच....

मुकुटबनात दोन धंदे बंद, लाडका “नू**र’ मात्र सुरूच….

Ajay,Wani : मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असल्याची चर्चा असलेल्या अवैध व्यवसायांमध्ये सध्या ‘दोन धंदे बंद झाले’ ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. मुकुटबन पोलीस निरीक्षकांनी दोन मटका व झेंडीमुंडीचे धंदे बंद केल्याची मोठी चर्चा परिसरात आहे. मात्र, तिसरा आणि मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जाणारे तथाकथित “मस्त रग्गड मलाई” असलेल्या आखो का लाडका “नू***र’ याचा दररोज लाखोंची उलाढाल होत असणाऱ्या “स्पेशल मटका व झेंडीमुंडीकडे” मात्र लक्ष का जात नाही,असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे ‘आखो का नू**र’ या नावाने ओळखला जाणारा कथित मटका व झेंडीमुंडीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, येथे लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा मुकुटबन परिसरात आहे. त्यामुळे दोन धंदे बंद झाले असतील, तर तिसरा धंदा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा असताना त्याकडे दुर्लक्ष का? नेमके कोणाच्या ‘मलाई’वर हा धंदा सुरू आहे? असा बोचरा सवाल ग्रामस्थांमध्ये केला जात आहे. यात“भा**ड” खाणारा कोण कुणाचे आशीर्वादाने हा भा***ड खाऊ धंदा सुरू आहे.

गावातील नागरिकांना अवैध धंद्यांमुळे त्रास होत असल्याचे नेहमी प्रकाशित होतं असलेल्या बातम्या होत असलेल्या तक्रारी खूप जास्त सांगितले जात आहे. त्यामुळे ‘आखो का नू**र’ हा कथित अवैध मटका अड्डा नेमका कोणाचा आशीर्वादाने प्रकार आहे, याची मुकुटबन पोलीस निरीक्षक दखल घेणार का? दोन धंदे बंद झाल्यानंतर तिसऱ्या धंद्याबाबत काहीतरी “एखादं पंटर” उचलून आणून थातूरमातूर कारवाईचा बडगा’ उघडणार की हा  लाडका “नू***र” याचा धंदा असाच सुरू राहणार, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दोन बंद आणि तिसरा सुरू—मग यामागे “तो” सुरू ठेवायला लावणारा “हराम**खो**र” कोण? हा प्रश्न मात्र मुकुटबनमध्ये जोरदार चर्चेत आला आहे. यावर पोलिस निरीक्षक व संबंधित बीट जमादार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष थातूरमातूर कारवाई की “रहणे दे सुरू” ची भूमिका राहील….?

क्रमशः…… पुढील भागात 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page