Thursday, October 8, 2026
HomeUncategorizedAdditional SP तर्फे ठाणेदार भानुदास पिदूरकर व टीमचा "डंका"...

Additional SP तर्फे ठाणेदार भानुदास पिदूरकर व टीमचा “डंका”…

Ajay,Wani : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेले तब्बल ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने वणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून हस्तगत केले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे दागिने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते मूळ मालक बंडू विठोबा बोढाले व त्यांच्या पत्नी आशा बोढाले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे वणी पोलिसांच्या तपासकामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

१ सप्टेंबर २०२६ रोजी कनकवाडी, वणी येथील बंडू विठोबा बोढाले यांच्या घरी घरफोडी करून लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच वणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. विविध दिशांनी तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक करून चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा माग काढला.अथक प्रयत्नांनंतर वणी पोलिसांच्या हाती ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने लागले. यामध्ये सोन्याचा चपला कंठी हार २५ ग्रॅम, सोन्याचा मोठा गोप १५ ग्रॅम, सोन्याचा लहान गोप ५ ग्रॅम, सोन्याचे दोन टाप्स ३ ग्रॅम तसेच सोन्याचे दोन टाप्स २ ग्रॅम, अशा दागिन्यांचा समावेश आहे.

Additional SP अशोक थोरात यांचा हस्ते मालकाला मुद्देमाल परत व ठाणेदार भानुदास पिदूरकर व टीमचा “डंका”….

हस्तगत केलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकाकडे परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. वणी पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते बंडू बोढाले व त्यांच्या पत्नी आशा बोढाले यांना ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने सुपूर्द करण्यात आले.यावेळी चोरीचा मुद्देमाल पुन्हा आपल्या हाती मिळाल्याने बोढाले कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मुद्देमाल सुपूर्दगीमुळे पोलिसांच्या तपास प्रक्रियेवरही प्रकाश पडला.

 

वणी ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या कार्यपद्धतीची चर्चा…

या कारवाईच्या निमित्ताने वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक आणि डीबी पथकाच्या कामगिरीचीही चर्चा होत आहे. घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरीस गेलेल्या सोन्याचा शोध घेऊन तो मूळ मालकापर्यंत पोहोचविण्यात वणी पोलिसांना यश आले.अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनीही वणी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले. गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून तो कायदेशीर प्रक्रियेद्वारे संबंधित नागरिकाला परत मिळवून देणे, ही बाब पोलिसांच्या कामातील महत्त्वाची बाजू मानली जात आहे.दरम्यान, ठाणेदार म्हणून भानुदास पिदुरकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून नागरिकांशी संवाद आणि तक्रारदारांशी माणुसकीचा व्यवहार याबाबत सकारात्मक चर्चा होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील फरक न करता प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेण्याची कार्यपद्धती असल्याचेही नागरिक सांगतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page