Thursday, October 8, 2026
HomeUncategorizedॲड.निलेश चौधरी यांचे CM Relief Fund मध्ये रु २१ हजारांचे योगदान .....

ॲड.निलेश चौधरी यांचे CM Relief Fund मध्ये रु २१ हजारांचे योगदान …..

Ajay,Wani : वाढदिवस म्हटल की उत्सव, शुभेच्छा आणि खर्च हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, या रूढीला फाटा देत अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी आपला वाढदिवस सामाजिक जाणीवेतून साजरा केला. राज्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस २१ हजार रुपयांची मदत दिली.

वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तोच पैसा संकटग्रस्त नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी उपयोगी पडावा, या उद्देशाने चौधरी यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page