•वणी पोलीस अँक्शन मोडमध्ये
•वणीत येताच…… पोऊनी शिवाजी टिपूर्णे ने दाखविले महानगररुपी धाड
अजय कंडेवार,वणी:- रविवार दि.25 सप्टेबर दूपारला वणी ते घुग्गुस जाणा-या रोडच्या मांडवकर बारच्या पाठीमागे असलेल्या जंगल भागात कोंबड बाजार सुरु असल्याची टीप मिळताच पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एकुण २लाख १७ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,वणी ते घुग्गुस जाणा-या रोडच्या मांडवकर बारच्या पाठीमागे असलेल्या जंगल भागात काही इसम सार्वजनिक ठिकाणी कोंबडा पक्षाचा झुंजीवर पैश्याची बाजी लावुन हार जित था कोंबड बाजार नावाचा जुगाराचा खेळ खेळवित आहे. या माहितीवरून ठाणेदार पो.नि. रामकृष्ण महल्ले यांचे मार्गदर्शनात धडाकेबाज धाड मारले असता, त्यात दानिश शकील शेख (वय २१ वर्ष) रा. रंगनाथनगर वणी.चेतन किशारे राउत (वय २५ वर्ष) रा. रंगनाथनगर वणी ता. वणी जि. यवतमाळ व सादीक शेख अब्दुल वहाब वय ३२ वर्ष, रा. शास्त्रीनगर वणी हे सर्व आरोपी इसम हे कोंबडा पक्षाचे झुंजीवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा घटनास्थळावरून जुगार खेळत असताना मिळुन आले तसेच काही इसम दुचाकी सोडून पळुन गेले.

या धाडीत घटनास्थळावरून एक मरण पावलेला व एक मरणासन्न अवस्थेत असलेला एक असे ०२ कोंबडापक्षी नग किंमत ४००/- रूपये दोन लोखंडी धारदार काती किंमत १००/- रूपये, वेगवेगळया कंपनीचे व मॉडलेच्या मोटार सायकल ०३ एकुण किंमत २१०,०००/- रूपये व नमुद इसमान कडुन एकुण नगदी ७,२२० /- रूपये असा एकूण २ लाख १७ हजार ७२०रू मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तीनही आरोपीविरुद्ध कलम ६५४ / २०२२ कलम १२ (ब) १२(क) महाराष्ट्र जुगार कायदा सह कलमांतर्गत वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ,खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि. रामकृष्ण महल्ले यांचे आदेशावरून पोउपनि शिवाजी टिपुर्णे, पो.उप.नि.प्रविण हीरे, वसिम ,दडमल, महेश पुढील तपास अधिकारी म्हणून पोउपनि शिवाजी टिपुर्णे हे करीत आहे.


