Sunday, August 30, 2026
HomeBreaking Newsलाचखोर पुरवठा निरीक्षक संतोष उईकें अडकला ACB च्या जाळ्यात.....

लाचखोर पुरवठा निरीक्षक संतोष उईकें अडकला ACB च्या जाळ्यात…..

•वणी तहसिल येथील घटना

अजय कंडेवार,Wani:- येथील तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयातील लाचखोरी सर्वश्रुत आहे. येथील पुरवठा निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने गुरूवारी दुपारी ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गेल्या महिनेभरापासून या लाचखोर अधिकाऱ्याच्या कारनाम्याची चर्चा वर्तुळात सुरू होतीच अखेर तो “संतोष “हा वणी तहसिल क्षेत्रात असंतोष मध्ये बदल झाला.या संतोष च्या संपर्कात तालुक्यातील रेशनचा काळाबाजार करणारे अनेक जण या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. अखेर परवानाधारक एसीबीकडे तक्रार केली आणि लाचखोर अधिकारी गजाआड झाला.

संतोष उईक (४०) असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. त्यांनी वणी येथील तक्रारदाराला ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी काहीं रुपयांची लाच पहिलेच स्वीकारली होती. उर्वरित काहीं हजारांची रक्कम त्यांनी अमरावती एसीबीच्या पथकाने लावलेल्या सापळ्यासमोरच स्वीकारली.वणी तहसील कार्यालयातील रेशन कार्ड विभागात पैसे देताना संतोष उइके याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लाचेस्वरूपात स्वीकारलेली ७० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी वृत लिहीपर्यंत वणी पोलिस ठाण्यात एसीबीचा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई अमरावती येथील पोलिस निरीक्षक योगेश दंदे व सहकारी यांनी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page