Friday, April 24, 2026
HomeBreaking NewsRahul Gandhi तुम हिंदू धर्म से माफी मांगो....

Rahul Gandhi तुम हिंदू धर्म से माफी मांगो….

•भाजपा तर्फे जाहीर निषेध.

अजय कंडेवार,वणी:- शहरातील टिळक चौकात भाजपा तर्फे खा. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि त्यांच्या फोटोला काळी श्याही लावून निषेध व्यक्त करण्यात आला.संसदेच्या सभागृहात हिंदू हे हिंसक असतात असे वादग्रस्त वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी केले होते. Rahul Gandhi you apologize to Hinduism

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत वणीत भाजपने आक्रमक भूमिका घेऊन राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळी श्याही लावीत निषेध आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचे फोटो फाडून त्यांचा निषेध केला. राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, गजानन विधाते, नितीन वासेकर,भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page