Friday, April 17, 2026
Homeवणीरोटरी क्लब व क्रेशर असोसिएशन मोहदा तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन....!

रोटरी क्लब व क्रेशर असोसिएशन मोहदा तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन….!

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात साधन संपत्तीने नटलेल्या गावामध्ये अग्रस्थानी असलेल्या मोहदा ग्रामपंचायत येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दि.०४ नोव्हें.२०२३ ला स. १०.३० ते ३.३० वा पर्यंत स्थळ -जिल्हा परिषद शाळा, मोहदा येथे करण्यात आले आहे. हे आयोजन रोटरी क्लब ऑफ चंद्रपुर आणि क्रेेेश्शर असोशिएशन मोहदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असुन या मध्ये लहान मुलांची तपासणी, हृदय तपासणी, सांधे व गुडघे दुखणे, स्त्री रोग चिकित्सा, मुख कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय तपासणी, डायबेटिस तपासणी, त्वचा रोग तपासणी सारख्या अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ४ नोव्हेंबर 2023 आज रोज शनिवारला सदर भव्य शिबिराचे आयोजित करण्यात आले असुन. या कार्यक्रमाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती तर शिरपूर ठाणेदार संजय राठोड यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच वर्षा रविंद्र राजुरकर,उपसरपंच सचिन राशेकर,गणेश बोंडे, गजानन शेलवडे, बेबी उईके,अर्चना गेडाम,सुवर्णा बोंडे,सिमा ढुमणे,शोभा टेकाम असणार आहे.

या भव्य आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अध्यक्ष राजेश बियाणी (श्री साई मिनरल्स मोहदा),सचिव इस्माईल झवेरी (विदर्भ प्रोजेक्ट प्रा.ली.मोहदा), कोषाध्यक्ष रमेश मुंधडा (बालाजी असोस्सिएशन,मोहदा), रो.अनुप यादव (अध्यक्ष), रो.इस्माईल झवेरी (प्रकल्प निर्देशक),रो.कुंजबिहारी परमार (सचिव) यांनी नागरीकांना आवाहन केले.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page