Ajay ,Wani : घुग्घूस-वणी मार्गावरील वर्धा नदीत उडी घेऊन सावंगी येथील सलून व्यावसायिक संजय भाऊराव हनुमंते (वय ५४) यांनी आत्महत्या केल्याची पुष्टी झाली आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास नदीच्या पुलावर टी-शर्ट, पाण्याची बाटली आणि आधारकार्ड आढळून आल्याने या घटनेचा उलगडा झाला. आधारकार्डवरून त्यांची ओळख पटताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नदीतून मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय हनुमंते हे १० ऑक्टोबर रोजी पहाटे घरातील सदस्यांना काहीही न सांगता घराबाहेर पडले होते. रात्र होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, घटस्थापनेच्या दिवशीच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सावंगी गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यांच्या अंत्यविधीला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.

