Sunday, October 4, 2026
HomeUncategorizedसंदीप गोहोकार यांची जगप्रसिद्ध University of Bristol, England येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश.....

संदीप गोहोकार यांची जगप्रसिद्ध University of Bristol, England येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश…..

Ajay,Wani:- एका बाजूला ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा… आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंडमधील जगप्रसिद्ध University of Bristol! या दोन टोकांना जोडणारा ज्ञानाचा धागा ठरला आहे ते वनोजादेवी येथील शिक्षक संदीप संजय गोहोकार. ग्रामीण विद्यार्थ्यांना भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेला संदीप, यांची प्रतिष्ठित University of Bristol येथील MSc या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे असून महाराष्ट्र शासनाच्या नामांकित परदेशी शिष्यवृत्तीच्या सन 2026-27 (Maharashtra state government overseas scholarship) साठी सुद्धा निवड झाली आहे. राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांची निकषांच्या आधारे शासनाद्वारे परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड केली जाते… मिळालेली ही संधी त्यांच्या वैयक्तिक यशापेक्षा ग्रामीण शिक्षणाच्या व्यापक ध्यासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

मार्गदर्शक रामटेके सर यांच्या क्लासेस मधून महापुरुषांच्या विचाराची ओळख झाली या विचारांचा प्रभाव असल्याकारणाने पदवीचे शिक्षण सुरू असताना संदीपने मित्रांसोबत शिक्षण प्रसारक मंडळा द्वारे शैक्षणिक जागृती आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले, सामाजिक जाण असलेल्या सुशिक्षित युवकांचा एक गट तयार झाला आणि युवाशक्ती नावाने ओळखला जाऊ लागला. युवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक समानता व बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नाच्यावर गावा गावात जनजागृती व आंदोलन करण्यात आली. युवकांमध्ये कौशल्य विकासाच्या दृष्टीने कॅम्प घेतल्या गेले. देश विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या सामाजिक हेतूने chevening स्कॉलर ऍड दीपक चटप त्यांच्यासोबत महाविद्यालयामध्ये शिक्षण यात्रा काढण्यात आली. परीक्षा व प्रवेश परीक्षा च्या पेपर लीगच्या संदर्भाने स्थानिक पातळीवर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरू तुकोबारायांनी एकमेकांच्या सहकार्यातून सुपंथ धरण्याचा उपदेश केला. “एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हा विचार सहकार चळवळीचा पाया आहे. “विना सहकार नाही उद्धार” महाराष्ट्रामध्ये सहकार हे आर्थिक सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने, आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. शेतकरी, बचतगट आणि युवकांना आर्थिक आधार देत सहकाराच्या माध्यमातून रोजगार व आर्थिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण केली. शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण, रोजगार आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधींबाबत विद्यार्थी व पालकांपर्यंत माहिती पोहोचवली. उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.सर्व कार्याची दखल घेत युनिव्हर्सल युथ लीडरशिप समिट इंडोनेशिया या जागतिक परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली. युवकांचे प्रतिनिधित्व केले.

शिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा वनजादेवी येथे याचे कार्य करीत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव सुगमनं शिक्षणाशी जोडले. शिक्षण ही विद्यार्थ्यांना आनंददायी बाब केली. स्टुडन्ट स्टडी रूम नावाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. उपक्रम प्रतिष्ठित अशा बीबीसी मराठी न्यूजने प्रकाशित किंवा प्रसिद्ध केला.युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल ही इंग्लंड मध्ये स्थित असून जागतिक पातळीवर युनिव्हर्सिटी qs रँकिंग नुसार 51 नंबर वर असून युकेच्या टॉप टेन युनिव्हर्सिटी मध्ये समाविष्ट आहे. संपूर्ण जगभरातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात.ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीतील अभ्यासक्रम निवडताना पक्त नोकरी पुरता अभ्यासक्रम न निवडता ज्या अभ्यासक्रमाच्या साधनाने समाजामध्ये बदल घडवू शकतो. असा मास्टर ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज अभ्यासक्रम निवडला.आपल्या ज्ञानाचा संपूर्ण समाजाला प्रत्यक्ष उपयोग व्हावा असा दृष्टिकोन यावरून लक्षात येते. विकासाच्या जागतिक संकल्पना, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समानता यांचा सखोल अभ्यास करून हे ज्ञान ग्रामीण व वंचित समाजाच्या विकासासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे.

जागतिक विद्यापीठ व शिष्यवृत्ती वेळा वेळी मार्गदर्शन, सहकार्य असते असे मित्र ॲड,दीपकभाऊ चटप, कुठल्याही परिस्थितीमध्ये नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. जयसिंग पाटील गोहोकार, माझे दोन्ही भाऊ स्वप्निलदादा गोहोकार, रामटेके सर, चटप सर ज्याच्या सहकार्य विना हे शक्य झाले नसते आकाश मते, ओम ढेंगळे, चंदू दोडके, ॲड रुपेश ठाकरे, नितू तुरणकर, अनिकेत मोहितकर, ॲड.राहुल खारकर, अमित उपाध्ये, अक्षय कवरसे, गौरव जवादे, धीरज भोयर, आशिष रिंगोले, शुभम गावंडे, सुजित गाताडे प्रत्येक वेळेला सर्व सामाजिक कार्यामध्ये माझ्यासोबत असणारे युवाशक्ती संघटनेतील माझे सर्व मित्र हे यश माझं नसून यांच्या सर्वांचा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page