Ajay,वणी : लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गोपालकाला व दहीहंडी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
श्रीकृष्णाच्या बाललीला, गोकुळातील आनंदमय वातावरण आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कृष्णभक्तीचा आनंद अनुभवला.तसेच नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच विविध पारंपरिक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या निरागस अभिनयाने व आकर्षक वेशभूषेने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तथा परीक्षक म्हणून लायन खुशी नगरवाला व मधुलिका खुंगर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन चंदा पांडे व सुवर्णा महितकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिव्या चौधरी यांनी केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जया सरमोकदम व रीता गाडगे तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुंदररीत्या पार पडला. कार्यक्रमाला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

