Sunday, August 9, 2026
HomeCityलायन्स स्कूलमध्ये पालक-शिक्षक संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लायन्स स्कूलमध्ये पालक-शिक्षक संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वणी : शहरातील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी व रवीनगर येथे ७ व ८ ऑगस्ट रोजी पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले. नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार तथा शाळेचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे, पालक प्रतिनिधी नेहा कडू, रागीणी नंदीग्रामवार, सुहास कुसराम व सरिता कोंडावार यांची उपस्थिती होती. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील उपक्रम तसेच विविध अडचणींबाबत प्रश्न व सूचना मांडल्या.

पालकांच्या प्रश्नांना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्यक्ष संवाद साधून उत्तरे दिली. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविणे हे शाळेचे उद्दिष्ट असून पालकांनी मांडलेल्या समस्यांचे योग्य निराकरण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी घरी अभ्यासाचे पोषक वातावरण निर्माण करून मुलांच्या नियमित अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. पालक प्रतिनिधींनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत पालक, शिक्षक व व्यवस्थापनातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षिका रंजू झाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनीता खुसपुरे यांनी प्रास्ताविक केले, गुलनाज शेख व भारती वानखेडे यांनी सूत्रसंचालन, तर मृणाल चौधरी व शुभांगी बरडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शिपाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page