Ajay, Wani:- वणी शहरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, वाहतूक, रस्ते आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न सातत्याने ऐरणीवर आणत शिंदेसेनेचे शहरप्रमुख शिवराज पेचे हे शहरातील एक सक्रिय आणि लढाऊ नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. केवळ निवेदने देऊन थांबण्याऐवजी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडण्याची त्यांची कार्यपद्धती सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
बाजार समितीच्या मागील गेटपासून रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा अत्यंत धोकादायक रस्ता, पुलाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा वाढता धोका या गंभीर प्रश्नांवर शिवराज पेचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धडक पाठपुरावा केला. त्याची दखल घेत पीडब्ल्यूडीने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर शहरातील शालेय बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत वाहतूक विभागाकडेही त्यांनी निवेदन सादर केले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनाचीही संबंधित विभागाने सकारात्मक दखल घेतल्याचे ही दिसून येत आहे.
शहरातील विकासकामे आणि जनहिताच्या छोट्या छोट्या प्रश्नांवर प्रशासनाला जबाबदार धरणारे नेतृत्व म्हणून शिवराज पेचे यांची प्रतिमा दिवसेंदिवस अधिक ठळक होत आहे. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास त्रुटी आणून त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शिंदेसेनेसाठीही ही जनसंपर्काची प्रभावी शैली ठरत असून, शहरातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शिवराज पेचे यांचा हा सक्रियपणा निश्चितच लाभदायक ठरणार

