Ajay ,Vidharbh news : एका प्रभावशाली नेत्याच्या कथित निकटवर्तीयाच्या संरक्षणाखाली जुगार पत्त्यांचा क्लब दिवसापेक्षा रात्री हायप्रोफाइल जुगार चालत असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित जुगार क्लब कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरू असल्याचा दावा केला जात आहे आणि हा क्लब एका पुलाचा बाजूलाच एका नेत्याचा ‘माणूस’ चालवित असल्याची बोंब आहे. परंतु नवल हेच की नेत्यांचेच माणस चालवे क्लब,चोरे रेती, चालवे कोंबड बाजार? आणि त्याचेच पदाधिकारी करतेय मोठ्या नाकाने दुसऱ्यांचा धंद्यात ‘काड्या ‘. मग ते निवेदनातून असो की तक्रारीतून ही तर एक फॅड निर्माण झाला आहे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे ‘. काहीं नेत्यांचे माणस तर अमुक निवेदन द्या सेटल करून घ्या अन् ‘माया कमवा ‘ हेही नवीन गोरखधंदा नेत्यांचा माणसायने सुरू केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यातील हा कथित जुगाराचा एक प्रकार आहे.
या कथित जुगार क्लबच्या परिसरात रेकी करण्यासाठी काही व्यक्ती 4 ते 5 चमचे कायम लोकेशन साठी तैनात असतात अशी माहिती आहे.पोलिसांचे वाहन परिसरात दिसताच “तो कथित क्लब ” काही वेळासाठी बंद केला जातो आणि परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा सुरू केला जात अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.शहरात असा सवाल उपस्थित केला जात आहे की, जर हा कथित प्रकार इतक्या उघडपणे सुरू असेल, तर संबंधित यंत्रणांना त्याची माहिती नाही का? की प्रभावशाली राजकीय पाठबळामुळे कारवाईला खीळ बसत आहे? या चर्चांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान, या कथित जुगार क्लबबाबत जिल्हा पोलिस विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी शहरातून जोर धरत आहे.

