Thursday, August 6, 2026
HomeBreakingविरोधकांना दिला मान.....नगराध्यक्षांकडून बैठकीसाठी स्वतंत्र जनरल हॉलची व्यवस्था......

विरोधकांना दिला मान…..नगराध्यक्षांकडून बैठकीसाठी स्वतंत्र जनरल हॉलची व्यवस्था……

Ajay,Wani:- वणी नगर परिषदेत स्वतंत्र कक्षाच्या मागणीवरून झालेल्या चटई आंदोलनानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा मान राखत तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. वणी नगरपरिषदचे उपाध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी नगर परिषदेच्या वरच्या मजल्यावरील जनरल हॉल आता विरोधी नगरसेवकांना जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी, बैठका घेण्यासाठी तसेच विविध विषयांवर गुपित चर्चा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे कारण ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये जागेची कमतरता व मागणीला मान यावरून जनतेचा काही समस्या विरोधकांपर्यंत येत असेल तर त्यांना देखील बैठक करता आली पाहिजे म्हणून हा निर्णय विरोधकांना मान देत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांचा काही समस्या मांडण्यासाठी या हॉलमध्ये विरोधी नगरसेवकांना भेटण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली.

नगर परिषदेची विद्यमान इमारत ब्रिटिशकालीन असल्याने जागेची मोठी मर्यादा आहे. त्यामुळे नवीन इमारत उभी राहेपर्यंत स्वतंत्र कक्ष देणे शक्य नसले, तरी विरोधकांची मागणी पूर्णपणे नाकारण्याऐवजी त्यांना सन्मानाने काम करता यावे, यासाठी तातडीने ही बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती न . प.उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांनी दिली. त्यामुळे आंदोलनानंतर तोडगा काढण्याच्या भूमिकेला प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे.

दरम्यान, जनतेतूनही सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, वरच्या मजल्यावर जाणे शक्य नसलेल्या वयोवृद्ध, दिव्यांग किंवा अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत विरोधी नगरसेवकांनी स्वतः जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी उपलब्ध मर्यादित जागेत विरोधकांना सन्मानाने बैठकस्थळ उपलब्ध करून दिल्यानंतर आता या सुविधेचा उपयोग केवळ राजकारणासाठी नव्हे, तर नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी व्हावा, अशीच सर्वसामान्यांची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page