Ajay Wani : खाती चौकातील कॉर्नर हॉटेलचा बाजूला संशयित कॅफे व त्या लॉजबाबत नागरिकांमध्ये सुरू असलेल्या तक्रार आणि चर्चेची दखल घेत वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी गुरुवारी रात्री स्वतः पथकासह संबंधित लॉजवर अचानक पाहणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने लॉजमध्ये प्रवेश करून प्रत्येक रूमची तपासणी, विचारपूस तसेच नोंदवही व ओळखपत्रांची पडताळणी केली तसेच सर्व आधार कार्ड संशयित आधार कार्ड सुद्धा त्यांच्या हाती लागलेले आहेत ते संशयित आधार कार्ड सुद्धा चौकशीसाठी नेण्यात आलेले आहे. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या कारवाईत काही नोंदी आणि कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
खाती चौकातील या लॉजबाबत काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली होत असल्याच्या चर्चा शहरभर सुरू होत्या. “कॅफेच्या आड” मध्ये “बाजूला लॉज” हे नागरिकांना खटकत होतं म्हणून अनेक तक्रारी सुद्धा तिथे करण्यात आलेले होत्या.त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वणी शहरातील लॉजमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळखपत्र नोंद, कागदपत्रांची अचूक पडताळणी आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बनावट आधार कार्ड पोलिस चौकशीसाठी घेऊन जाण्यात येईलतसेच भविष्यात कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही लॉज चालकाला देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि संशयास्पद हालचालींवर कठोर कारवाईचे धोरण स्वीकारले असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. कोणतीही तक्रार गांभीर्याने घेऊन स्वतः घटनास्थळी पोहोचून वस्तुस्थितीची खातरजमा करण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा या कारवाईत दिसून आली. या प्रकरणाबाबत अधिकृत तपास सुरू असून, आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता लॉज चालक कोणत्याही संशयात पण परिस्थितीत आढळल्यात वणी पोलीस त्यांचा हालचालीकडे विशेष लक्ष देऊन आहे असं स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहे.

