Ajay,Wani:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात यंदा २०० रक्तपिशव्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, वणी शहरातील नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रत्येक रक्तदात्याने स्वतः रक्तदान करण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि इच्छुक नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानासारख्या सर्वोच्च सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. समाजहिताचा हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी संयोजक बालाजी भेदोडकर (युवा मोर्चा अध्यक्ष – ९७३८३४१६१६), सहसंयोजक विलास डवरे (शहर उपाध्यक्ष – ९४०४५२६७६९), सहसंयोजक वैशाली वातिले (नगरसेवक – ९४२१८५१७२५) आणि सहसंयोजक भारती बदखल (शहर उपाध्यक्ष – ८३२९११६७०५) यांच्याशी संपर्क साधता येईल. ही माहिती ॲड. निलेश माया महादेव चौधरी, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

