Ajay,Wani:- अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी आणि कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर व रामभक्ताचा वतीने येथे आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. जागृती मारोती मंदिर,आंबेडकर चौक ते ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात येथे शिवसैनिकांनी रामरक्षा स्तोत्र पठण तसेच महाआरती केली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी श्रीराम मंदिर देणगी चोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.

शिवसेना ठाकरे गटाचे वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर आणि जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात जागृती मारोती मंदिर,आंबेडकर चौक ते ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसर येथे ‘रामरक्षा स्तोत्र’ पठणाने झाली. यावेळी शिवसैनिकांनी एकत्रित येत महाआरती केली. महाआरती संपताच उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दान लुटणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रभू श्रीरामाच्या नावावर राजकारण करणाऱ्या आणि मंदिरातील दान चोरणाऱ्यांचा तीव्र निषेध असो, अशा घोषणांनी संगमेश्वर परिसर दुमदुमून गेला होता.
हे आंदोलन केवळ राजकीय निषेधापुरते मर्यादित न ठेवता त्याला धार्मिक जोड देण्यात आली होती. महाआरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. या आंदोलनाबाबत बोलताना शिवसेना नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ज्या प्रभू श्रीरामावर कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा आहे, त्या मंदिराच्या दानावर डल्ला मारणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. या चोरांचा बुरखा फाडण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्हाप्रमुख संजय निखाडे, किरण देरकर, विनोद ढुमणे, संतोष कुचनकर, सुधीर थेरे, पंढरी राजुरकर, सचिन कुचणकर, मंगेश मोहितकर, सत्यवान महाकुलकर, दिवाकर उरकुंडे, टीमन टोंगे,किर्ती देशकर,सविता आवारी, मोरेश्वर उज्वलकर, अनिकेत बदखल, राजू पाटील, प्रकाश कराड, सुरेश देशकर, डॉ. जूनघरी, महेश सोमलकर, किशोर मोहेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

