Vidarbh Ajay, Wani:- तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार “API संतोष मनवर “यांनी त्यांचा अभ्यासू, संयमी आणि परिणामकारक तपासशैलीमुळे वणी उपविभागात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गुन्हा कितीही गुंतागुंतीचा असला तरी त्यातील प्रत्येक धागा तपासून, प्रत्येक पुराव्याची पडताळणी करून आणि तपास शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याची त्यांची कार्यपद्धती व शैलीची चर्चा सध्या वणी उपविभागात सुरू आहे.

मार्डा धरण प्रकरण असो किंवा M.D प्रकरणातील तपास, वरिष्ठांनी सोपविलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हाताळल्याची चर्चा आहे. गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक माहिती, गुप्त माहिती आणि प्रत्यक्ष तपास यांचा समन्वय साधत काम करण्याची त्यांची शैली अनेकांना लक्षवेधी वाटत आहे. त्यामुळे वणी उपविभागातील अभ्यासू आणि तपासकेंद्री अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जात आहे.
उत्कृष्ट(Intelligent )तपासकौशल्य, शांत स्वभाव आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर API “संतोष मनवर “ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या तपासांची जबाबदारी मिळवली असून, त्यांच्या कामाची बोंब पोलीस वर्तुळात होत आहे. गुन्ह्यांची उकल करताना केवळ आरोपीपर्यंत न थांबता संपूर्ण साखळी समोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न हीच या अधिकाऱ्याची खरी ओळख बनत आहे.


