Tuesday, June 30, 2026
HomeBhramhouri"ड्रग्स रॅकेटचा 'Boss' गजाआड ; राजिक अन्सारी अटकेत.

“ड्रग्स रॅकेटचा ‘Boss’ गजाआड ; राजिक अन्सारी अटकेत.

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील शिरपूर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत संपूर्ण रॅकेटचा कुख्यात सूत्रधार म्हणून ओळखला जाणारा नागपूर येथील राजीक अन्सारी याला बेड्या ठोकल्या आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये नाव समोर आलेला हा तस्कर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडल्याने ड्रग्ज माफियांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली होती. शिरपूर पोलिसांनी श्रेयश ऊर्फ गुड्डू पाटील याच्याकडून तब्बल ५७.१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आणि ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठा पर्दाफाश केला होता. त्यानंतर श्रेयश पाटील आणि त्याचा साथीदार अक्षय बागडदे यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत वणी परिसरातील ड्रग्ज तस्करीत रागीब अब्दुल अहमद रब (रा. वणी) याचा सक्रिय सहभाग उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचे एमडी जप्त केले.

या अटकसत्रानंतर तपासाची सूत्रे थेट नागपूरपर्यंत पोहोचली आणि अखेर या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या राजीक अन्सारीला शिरपूर पोलिसांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर वणीतील एमडी तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे ड्रग्ज रॅकेटमधील आणखी मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शिरपूर पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे एमडी तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page