Ajay Kandewar,Wani:- वणी शहरातील स्टेट बँक परिसरात राहणारा पियुष राजेश गटलेवार (17) हा युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी सायंकाळी सुमारे 7.40 वाजताच्या सुमारास पियुष घरातून बाहेर पडला होता. यापूर्वीही तो अधूनमधून कोणालाही न सांगता बाहेर जात असे आणि काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी घरी परत येत असे. मात्र यावेळी तब्बल दोन दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने पालकांची चिंता शिगेला पोहोचली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधाशोध करूनही त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, पियुष वापरत असलेली Activa 6G (MH-29 BR-1161) ही स्कुटी वणी रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली असून पोलिसांनी ती वाहन कुटुंबीयांच्या ताब्यात दिली आहे. मात्र पियुषचा अद्याप शोध लागलेला नसल्याने रहस्य अधिकच गडद झाले आहे. पियुषचा रंग गोरा, उंची सुमारे 5 फूट 3 इंच असून अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट व निळी जिन्स परिधान केल्याची माहिती आहे.
कोणालाही पियुषबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वणी पोलिस स्टेशन किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क : 9158790016.


