Wednesday, May 20, 2026
HomeBreakingराजूर PHC मध्ये खळबळ...यवतमाळची Inquiry Team दाखल....

राजूर PHC मध्ये खळबळ…यवतमाळची Inquiry Team दाखल….

Ajay Kandewar,Wani :- प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) राजूर येथील कथित मनमानी कारभाराच्या तक्रारीनंतर अखेर यवतमाळ येथून विशेष चौकशी पथक राजूर येथे दाखल झाले असून संबंधित प्रकरणाची 5 तासपासून चौकशी सुरू आहे. या घडामोडीमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, PHC मधील प्रशासकीय कारभार, कर्मचारी उपस्थिती, रुग्णसेवा तसेच विविध नोंदींबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले असून यवतमाळ येथील Inquiry Team ने अचानक राजूर PHC ला भेट दिली.सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशी समितीसोबत तालुका आरोग्य अधिकारी (THO) देखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. चौकशीदरम्यान विविध कागदपत्रांची तपासणी सुरू असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, गावकऱ्यांमध्ये या चौकशीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. “चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे आणि दोन्ही डॉक्टरांवर , संबंधित कर्मचारी दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आली होती. यात यात जर कारवाई एकतर्फी होत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर या गावकरी ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारी आहे.आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते आणि आरोग्य विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page