Desk:- त्या एका अवैध कारभाराच्या प्रकरणात आधीच मोठा धक्का बसलेल्या “त्या” जोडीदारांभोवती आता संशयाची वर्तुळे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. नुकतीच आणखी “एक गबाड” माध्यमांच्या हाती लागलेल्या काही महत्त्वाच्या माहितींमुळे, आतापर्यंत पडद्याआड राहिलेलं आणखी काही समोर येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गावकऱ्यांकडून मिळालेल्या संकेतांनी या प्रकरणाला नव्याने उकळी फुटली आहे. “जिथे धूर आहे, तिथे आग असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” अशी कुजबुज स्थानिक पातळीवर ऐकू येत आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप बाकी असल्याने, संशय अधिक गडद होत चालला आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे असल्याचे मत पुढे येत आहे. जर समोर आलेल्या धाग्यांना पुराव्यांची जोड मिळाली, तर “त्या” जोडीसाठी परिस्थिती अधिकच कठीण होऊ शकते. कायद्याच्या कक्षेत राहूनच या एका नवीन प्रकरणाचा एक नवीन दंड लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.सध्या तरी “काय लपवलं गेलंय?” हा प्रश्न सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकृत चौकशी आणि ठोस पुरावेच या नवीन घबाड प्रकरणाचं खरं चित्र स्पष्ट करू शकतात. तोपर्यंत, चर्चांचा धुरळा उडत असला तरी सत्य समोर येण्याची प्रतीक्षा कायम आहे.

