Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये वातावरण अक्षरशः राजेश्वर उर्फ राजू चापडे यांच्या बाजूने फिरलेले दिसत आहे. सकाळपासून सुरू झालेल्या मतदानात साठे यांच्या समर्थकांची रांग वाढतच असून अनेक मतदान केंद्रांवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
मतदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट संकेत दिसत आहेत की प्रभाग क्रमांक 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे हे प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये भक्कम आघाडीवर धावत आहेत. मतदान केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या चर्चेतही “या वेळी बदल हवा,प्रभाग क्रमांक 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे हेच विकासासाठी हव” अशा प्रतिक्रिया सतत ऐकू येत आहेत. विरोधकांकडे जात असलेला कल थोपवण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू असले तरी, मतदानाचा वेग आणि मतदारांचा ओढा पाहता ते स्पष्टपणे घामाघूम झाल्याचे चित्र दिसत आहे.मतदान संपेपर्यंत हे समीकरण कायम राहिल्यास, प्रभाग क्रमांक 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे विजयी फॉर्म्युल्याकडे सरळ वाटचाल करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दिवसभरातील मतदानाचा कल पाहता…
• प्रभाग क्रमांक 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे मजबूत स्थितीत•मतदारांचा उत्स्फूर्त आणि ठाम कौल•विरोधकांचा प्रचार निष्फळ ठरत असल्याची चर्चा

