Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी वणी शहरात प्रभाग क्रमांक 10 मध्ये एक कथित पैशाच्या वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले. हा व्हिडिओ भाजपच्या दोन्ही उमेदवारांशी जोडला जात असल्याची चर्चा विविध सोशल मीडिया ग्रुपमध्ये पाहायला मिळत असून, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उडालेल्या या धुमाळीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हाच तो वायरल झालेला वायरल व्हिडीओ…..
व्हिडिओमध्ये काही व्यक्ती हे भाजपचे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार यांच्या नावाचा उल्लेख करताना दिसत असल्याचा दावा अनेक सोशल मीडिया युजर्सकडून केला जात आहे. यामध्ये अशोक भंडारी व दिलीप भंडारी यांची नावेही चर्चेत येत असून, त्यांनी काही मतदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या सर्व दाव्यांची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप नाही.
मतदान सुरू असताना व्हिडिओचा उद्रेक — पक्षाची प्रतिमा हादरली
मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात राजकीय चर्चा वेगाने पेटली.“निवडणुकीच्या दिवशीच कथित पैशाचे वाटप?… हे अत्यंत धक्कादायक आहे”अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून येताना दिसल्या.“या व्हिडिओने भाजपची प्रतिमा हादरली असून विरोधकांना मोठा मुद्दा हातात मिळाला आहे.”व्हिडिओ पसरताच विरोधी पटलावरून भाजपवर थेट निशाण साधण्यात आले.“हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवर डाग आहे. भाजपचा भंडाफोड झाला.”असे आरोपात्मक विधान सोशल मीडियावर सुरू केले आहेत.जरी हे आरोप अद्याप अप्रमाणित असले तरी, प्रभाग 10 मधील राजकीय समीकरणावर याचा तातडीचा परिणाम झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओची सत्यता तपासण्याची मागणी
काही नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे या व्हिडिओची तपासणी,फॉरेन्सिक पडताळणी, सत्यता जाहीर करण्याची मागणी केली आहे.“हा व्हिडिओ ‘तथाकथित’ असून त्यातील माहितीची शहानिशा आवश्यक आहे”असे प्राथमिक मत व्यक्त करण्यात आले आहे.
वणी भाजपकडून मौन — शहरात चर्चेला वेग
भाजप किंवा संबंधित उमेदवारांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण न आल्यानेशहरातील राजकीय तापमान आणखी चढले आहे.“मौन म्हणजे मान्यता का? की तपास पूर्ण होईपर्यंत पक्ष बचावात्मक भूमिकेत?”असा सवाल मतदारांमध्ये ऐकू येत आहे.मतदानाच्या दिवशीच असा ‘कथित पैशाच्या वाटपाचा’ व्हिडिओ समोर आल्याने वणी नगरपरिषद निवडणुकीच्या इतिहासात हा प्रकार धक्कादायक ठरला आहे.आता या प्रकरणाची अधिकृत पडताळणी कशी होते आणि पक्षाची प्रतिक्रिया काय असते, हेच पुढील राजकीय घडामोडी ठरवणार आहे.

