Sunday, April 19, 2026
HomeBreaking Newsवणी हादरली.....भीषण अपघातात अख्या कुटुंबाचा मृत्यू...

वणी हादरली…..भीषण अपघातात अख्या कुटुंबाचा मृत्यू…

• पित्यासह तिन्ही मुलींचा करुण अंत . • महिन्याच्या अखेरचा दिवस ठरला घातक

अजय कंडेवार,वणी : शुक्रवार, 31 ऑक्टोबरचा दिवस वणी शहरासाठी काळा दिवस ठरला. शहराच्या बाहेरील भागात जन्नत हॉटेलसमोर घडलेल्या भीषण अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झाला आहे. स्कॉर्पिओ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत रियाजुद्दीन शेख, त्यांच्या तीन मुली आणि एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा उपचार  नागपूर येथे सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत गंगा विहार परिसरातील रियाजुद्दीन शेख हे लाल पुलिया भागात ट्रक रिपेअरिंग गॅरेज चालवत होते. शुक्रवारी सुट्टी असल्याने ते घरीच होते. सकाळी त्यांच्या मोठ्या मुली मायराने कार चालवायला शिकवण्याची विनंती केली. सुरुवातीला रियाज शेख यांनी नकार दिला, परंतु मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी मान्य केले. यावेळी दोन्ही लहान बहिणी आणि पाच वर्षांची भाची इनाया हिनेही सोबत जाण्याचा हट्ट धरला.

सकाळी सुमारे 10.00 वाजता रियाज शेख आपल्या तीन मुली व भाचीसह MH01 AH 5700 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ कारने ब्राम्हणी रोडकडे निघाले. जनत हॉटेलजवळ पोहोचल्यावर मोठी मुलगी मायराकडून कारचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरवरून उडत दुसऱ्या बाजूला गेली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या MH40 AK 0358 या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.या भीषण धडकेत कारचा ड्रायव्हर साईडचा भाग चकनाचूर झाला. घटनेनंतर वणी पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. पोलिसांनी मृत मायर, जोया व अनिबा यांच्या शवांना वणी शासकीय रुग्णालयात पाठवले.या अपघातात रियाज शेख किरकोळ जखमी झाले होते, परंतु आपल्या डोळ्यासमोर घडलेला हा भयंकर प्रसंग ते सहन करू शकले नाहीत. उपचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.या घटनेनंतर वणी शहरात शोककळा पसरली असून शासकीय रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहितीनुसार रेफर करण्यात आलेला मुलगी अद्यापही धोक्याचा बाहेर आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक गोपाल उस्करकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.महिन्याच्या अखेरीस घडलेल्या या भीषण अपघाताने वणी शहर हादरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page