Saturday, May 9, 2026
HomeBreaking Newsघनश्याम पावडे यांच्या शांत पण प्रभावी राजकारणामुळे "काँग्रेसला" नवी ऊर्जा.....

घनश्याम पावडे यांच्या शांत पण प्रभावी राजकारणामुळे “काँग्रेसला” नवी ऊर्जा…..

•याच शैलीने काँग्रेसला नवं बळ.

Ajay kandewar,Wani:- सध्याच्या गोंधळलेल्या आणि प्रचंड गाजावाजा करणाऱ्या राजकारणाच्या पटलावर वणी तालुक्यात एक वेगळं चित्र आकार घेत आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे यांनी सुरू केलेली गावोगावी बैठकांची मालिका आता फक्त राजकीय उपक्रम न राहता जनतेच्या विश्वासाचं नवं पर्व ठरत आहे.

घनश्याम पावडे यांचं काम करण्याचं धोरण वेगळं आहे – ना फडफड, ना घोषणाबाजी. थेट गावोगावी जाऊन नागरिकांना समोरासमोर भेटणं, त्यांच्या समस्या ऐकणं आणि शक्य त्या पातळीवर तात्काळ तोडगा काढणं हे त्यांचं कार्यपद्धतीचं मुख्य वैशिष्ट्य. “राजकारण म्हणजे गाजावाज्याचा खेळ नसून, नागरिकांशी नाळ जपण्याची कला आहे” हे पावडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.या बैठकींचा परिणाम गावोगावी जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पाड्यावर बसलेल्या चर्चांत पावडे यांच्या साधेपणाची, आपुलकीची आणि समस्यांवर लक्ष देण्याच्या प्रामाणिक वृत्तीची चर्चा आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे काँग्रेस पक्ष गावागावांत पुन्हा बळकटीकडे जात आहे.राजकीय क्षेत्रात नेहमीच प्रसिद्धीच्या झगमगाटाला जास्त महत्त्व दिलं जातं; मात्र पावडे यांची “शांत पण प्रभावी” शैली काँग्रेससाठी मोठं भांडवल ठरत आहे. या वाढत्या प्रभावामुळे तालुक्यातील काँग्रेसचे संघटन बळकट होणार हे स्पष्ट आहे.

येत्या निवडणुकांत ही शैली काँग्रेसला नवं बळ देईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “नेतृत्व हे आवाज देऊन नव्हे, तर लोकांचा आवाज ऐकून घडवलं जातं” हे दाखवून देणारे घनश्याम पावडे आज वणी तालुक्यात काँग्रेसच्या बळकटीकरणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत.घनश्याम पावडे यांनी उभं केलेलं हे शांत, जमिनीवरचं आणि नागरिकाभिमुख नेतृत्व काँग्रेससाठी झुकतं माप ठरत आहे. गाजावाज्याच्या पलीकडे असणाऱ्या या शैलीतून काँग्रेसला मिळणारा फायदा येत्या काळात नक्कीच अधिक अधोरेखित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page