Ajay kandewar,Wani:- नवरात्रीच्या उत्साहात रंगलेली वणी नगरी आता एका विशेष सोहळ्याची साक्षीदार ठरणार आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांचा वतीने राम शेवाळकर परिसरात भव्य गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात (ता.२६) सप्टेंबर, शुक्रवार रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व तेजस्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची खास उपस्थिती असणार आहे.
तेजस्विनी पंडित यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा तेजस्वी अभिनय आणि सामाजिक कार्यात असलेला सहभाग यामुळे त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे वणीतील असंख्य महिला, युवती आणि नागरिक या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने गर्दी करतील अशी अपेक्षा आहे.मनसेच्या गरबा महोत्सवाला नेहमीच एक वेगळा रंग असतो. फक्त नृत्य आणि गाण्यापुरता मर्यादित न राहता, हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि समाजिक ऐक्य यांचे दर्शन घडवतो. महिलांना सुरक्षित वातावरणात उत्साहाने गरबा सादर करता यावा यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी विशेष व्यवस्था केली आहे.
यंदाचा गरबा महोत्सव वणीतील सांस्कृतिक क्षेत्राला नवी ऊर्जा देणार आहे. मनसेकडून अशा उपक्रमांद्वारे शहरात सामाजिक आणि सांस्कृतिक बंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.

