Ajay Kandewar,Wani: उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय बस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचू नये, यासाठी स्कूलबस सुरक्षिततेसाठी वणी वाहतूक शाखेने महत्त्वाची बैठक घेतली होती.या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत तसेच खाजगी ऑटो चालकांना वाहतुकीबाबत चर्चा करण्यात आली होती. आता तर वणी वाहतूक शाखा प्रमुख API विजय महाले यांनी 2 अधिकारी 10 कर्मचाऱ्यासह टिळक चौक ते नांदेपेरा चौकात स्कूल बस सुरक्षित सुरक्षिततेसाठी व्यक्तिगत मोहीम राबवून “ऑन रोडवर” येऊन प्रत्येक स्कूल बसची तपासणी ,कागदपत्र तपासणी करणे तसेच किती विद्यार्थी बसले आहे याची नोंद करणे व ड्रायव्हरला सीट बेल्ट लावणेबाबत सूचना देऊन चालकांना तंबी देखील देण्यात आली.नियमबाह्य चालकांविरोधात 13 केसेस 5800 दंड आकारण्यात आला.
यावेळी वणी वाहतूक नियंत्रण उपशाखा API विजय महाले यांच्या मार्गदर्शनात PSI शंकर राजगडकर,ASI राजू बागेश्वर जमादार गोपाल हेपट,रूपाली बदकल,महेश राठोड प्रदीप भानारकर,संतोष फुलवळे,नवनाथ कल्याणकर ,विठ्ठल भंडारे,विशाखा घोडाम यांनी कारवाई केली.
“काहीं शाळकरी वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना नसल्याने एखाद्या वेळेस अपघात घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनासाठी नियमावली तयार केली त्या नियमाची पायमल्ली न करता पालन करणे गरजेचे आहे.” _ सपोनी विजय महाले (वणी वाहतूक नियंत्रण उपशाखा )

