विदर्भ न्यूज,वणी :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडेमी, वडगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शालेय “हेड बॉय व हेड गर्ल” या पदासाठी “बॅलेट पेपर” वर निवडणुका पार पडल्या. विशेष भर पावसातही विद्यार्थांचा उपस्थितीने मतदान टक्यात वाढ होऊन 96% टक्के मतदान झाले.

देशातील लोकशाही,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकांविषयी विद्यार्थी ऐकून असले तरी हा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता यावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे निवडणूक संदर्भात समज, गैरसमज या उपक्रमातून दूर करण्यात आले.उमेदवारी अर्ज मागवणे, छाननी करणे, मतपत्रिका छापणे, गुप्त पद्धतीने मतदान करणे, शाई लावणे या सर्व प्रक्रियांमध्ये तिसरी ते दहावी चा शकडो विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभागी झाले होते.यात इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळात हेड बॉय व हेड गर्ल या पदासाठी आराध्य रेभे, अरहम शेख, हर्ष खोब्रागडे, रुद्रा रघुवीर, विराज पोद्दार, अमोली सोनटक्के, अशमीरा खान, इचछा भगत व उर्वशी बेसरकर हे उमेदवार उभे होते.दोन दिवस वर्गा-वर्गांमधून प्रचार करून आपण शाळेसाठी काय करू इच्छितो, हे सांगितले. पर्यवेक्षक नितेश कुरेकर,अजय कंडेवार, वैभव दहेकर,विवेक देशपांडे,रुपाली वाघमारे, शबनम गणी व मुख्याध्यापक शोभना व क्रीडा शिक्षक सुधीर लडके आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

