Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsबघा आमदार साहेब....५ महिन्यांपासून गावें वाघाचा दहशतीत पण कोणीही लक्ष देईना.....!

बघा आमदार साहेब….५ महिन्यांपासून गावें वाघाचा दहशतीत पण कोणीही लक्ष देईना…..!

•अनेक निवेदन धूळखात. •५ महिन्यांपासून गाव दहशतीखाली  •एखाद्याच बळी जाण्याची वनपरिक्षेत्र अधिकारी वाट बघताहेत.?

Ajay Kandewar,Wani:- वणी वनपरिक्षेत्रातील (भूरकी , रांगणा, नांदेपेरा व शेलू) भागातील 3 km अंतरावर गेल्या ५ महिन्यांपासून वाघाचा वावरण्याची घटना घडत आहे .या हल्लेखोर वाघाने चराईसाठी जंगलात गेलेल्या 3 बकऱ्यावर हल्ला करून ठार मारले व गावातीलच दोन व्यक्तीवर 2 में रोजी त्या हल्लेखोर वाघाने हमला चढविला असता ते दोघे कसें बसे झाडावर चढले आणि जीव वाचविला. या घटनेवरून अनेकदा भूर्की गावात वाघ दिसत असल्याचा घटना नित्यनियमित घडतच आहे पण वनपरिक्षेत्र अधिकारी निवेदने दिलें व वनविभागाची रेस्क्यू टीमला वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत आहे आणि एखाद्याच बळी गेल्यावरच वनपरिक्षेत्र अधिकारी जागा होईल का?, वनविभागाने तात्काळ वरिष्ठांना पत्रव्यवहार करुन या भागात वावरत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करावा अश्या मागणीला आता गावकऱ्यांनी रेटून धरले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पासून वणी वनपरिक्षेत्रात (भूरकी , रांगणा, नांदेपेरा शेलू) वाघांकडून पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले केले जात असल्याने भुर्की गावांमध्ये दहशतीचे वातावरण असतानाच विशेष म्हणजे याच भागामध्ये याच गावातील एका बकरीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते.हल्लेखोर वाघामूळे या घडलेल्या घटनेंमुळे परिसरातील अनेक गावे दहशतीखाली आली आहेत. वाघाच्या भीतीने नागरिक जंगलात, शेतशिवारात जाणे टाळत आहेत. भुरकि गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदन दिले परंतु अद्यापही त्या वावरत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही. उलट वाघ हा नित्यनियमित गावकऱ्यांना दिसतच आहे. म्हणून परिसरातील नागरिक शेतात जाणे टाळत आहे. शेतीचे कामे करण्यासाठी आता भिती निर्माण झाली . भीतीचा सावटात गाव शेतकरी ५ महिन्यांपासून दिवस काढत आहे.वन विभागाने कोणतीही सतर्कता बाळगली नसून ज्या परिसरात वाघाचा वावर आहे, त्या परिसरात गस्त ही वाढविली नाही म्हणून आता तरी निद्रिस्त असलेल्या प्रशासनानें जागे व्हावें व या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी आर्त मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच वणी विधानसभा आ.संजय देरकर यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन प्रशासनाला कारवाई करण्यास सूचना द्यावा अशीही गावकऱ्यांची मागणी आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page