Wednesday, April 15, 2026
HomeBreaking Newsतहसिलदार सुट्टीवर...."विवेकबुद्धीने" रेती चोर भाऊ, आपणच वाटून खाऊ.....

तहसिलदार सुट्टीवर….”विवेकबुद्धीने” रेती चोर भाऊ, आपणच वाटून खाऊ…..

•वणी महसुल प्रशासनाचा चिंधळ्या उडताहेत. • रेती चोरट्यांचे "जयंत""विवेकबुध्दी"च कारभारी.

Ajay Kandewar,Wani :- तालुक्यातील वर्धा नदीतील “रेती घाटातून” अक्षरश: मशीनने रेती उपसा करून बेकायदा हायव्हा भरून रेती चोरी होत असल्याने स्थानिक R.I आणि तलाठी,नायब तहसीलदार व कर्मचारी रेती माफियांच्या वेसणीला बांधलेले आहेत का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोर भाऊ , आपण वाटून खाऊ या संकल्पेतुन रेती तस्करी कारभार चालला असून लाखो रुपयांच्या महसुलाचे भागीदार आहेत तरी किती हा संशोधनाचा विषय आहे. विशेषतः वणी महसुल प्रशासनाचा चिंधळ्या उडत आहे तरी मुजोर शासनाला काहीही फरक पडत नाही कारण “हमारत क्या जाता.. सरकार को चुना लगने दो “अश्या भूमिकेत वणी महसूल प्रशासन सध्या दिसत आहे. यात रेती चोरट्यांचे हस्तक “जयंत “,विवेकबुद्धी”च कारभारी असल्याच ऐकू येत आहे.

वणी प्रशासनातील तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी, मंडळअधिकारी यांची भूमिका संशयास्पद….

प्रशासनाची करडी नजर असताना देखील रेती तस्करी कशी काय चालते हा प्रश्न जनसामान्यांना पडत असून कुठे यांचे साटेलोटे तर नाही ना अशी चर्चा ऐकायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी बुडतो लाखोंचा महसूल,

वणीत अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर चालत असून सुध्दा याकडे लक्ष का दिले जात नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या पोटी दुर्लक्ष करतात की इतर काही. मात्र दरवर्षी लाखोंचा महसूल बुडत असताना देखील असे का होते हा प्रश्न निर्माण होत आहे.वर्धा नदी पात्रातून तसेच नदीला लागून असलेल्या नाल्याच्या पात्रातून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

•सब चोर साहेब….मग रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण….!

वणी तालुक्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, “ते सबकुछ मॅनेज है” ची भाषा करीत आहे. रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे ” कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.”वणी महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभाराबाबत नवनियुक्त यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज पडली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page