अजय कंडेवार,Wani:-शहरांतील नांदेपेरा रोडवर मांगल्य बार च्या समोर असलेल्या प्लॉटिंगमध्ये कोठारी यांच्या नवीन गाळ्याजवळ मंगळवार (18 मार्च) रोजी सकाळीं 10.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झाडाझुडपांत आढळला होता.सदर इसमाची ओळख पटली नसल्याने सदर व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णालय वणी येथे ठेवण्यात आले होते व सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी वणी पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी केले होते.
त्या अनोळखी इसमाची ओळख पटली असून दुर्गेश धनिराम मातलआमे (अंदाजे वय 25 ) रा.दुर्भा,तालुका खडगाव, जिल्हा राजनंदगाव असे त्या इसमाचे नाव असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर मृतक व्यक्ती हा आपली उपजीविका भागविण्यासाठी वणीतील बबलू शेंडे नामक मालकाकडे बोअरवेल मशीनचा कामावर जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्गेश हा 14 मार्च रोजी कामाला गेला आणि होळीनिमित मालकाने त्याला गावाला जाण्यासाठी अडवान्स दिला आणि तो कामावरून निघाला गेला होता परंतु तो नातेवाई यांच्याकडे आलाच नाही असे कळले. मागील तीन दिवसापासून शोधा शोध घेतला असता थांगपत्ता लागला नाही शेवटीं नातेवाईकांनी वणी पोलिसात हरविल्याची ( Missing) तक्रार नोंद केली.
दरम्यान 18 मार्च रोजी त्याचा मृतदेहच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झाडाझुडपांत मागे मृतावस्थेत आढळून आला. काही वेळ ओळख पटली नव्हती मात्र याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी ओळख पटवून मृतक शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आले असल्याचे समजते. सदर मय्यत इसमाचा मृत्यु कशाने झाला असावा, याचे कारण मात्र कळु शकले नसल्याने मृत्युचे नेमके कारण मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे. वणी पोलीस स्टेशनचें तपास सत्र सुरु आहे.

