Vidharbh News,Wani:- एक संतापजनक तेव्हढीच खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका चायनीज चा दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ता.17 चा रात्री निर्जनस्थळी नेऊन तिघा नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची हादरून सोडणारी दुर्दैवी घटना वणीत काल ता.19 रोजी उघडकीस आली.Gang Rape on minor girl in Wani.
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बसवून तिला वणी शहरातल्या निर्जन स्थळावर ऑटोने नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर तिघांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींना अटक केली.शंकर उर्फ राकेश नामदेव भोस्कर, आकाश उर्फ राहुल राकेश यादव रा.120 क्वार्टर राजूर कॉलरी व शंकर रामलखन यादव रा.75 क्वार्टर राजूर असं त्या अत्याचार करणाऱ्या तरुणांची नावे असून वणी पोलिसांनी पिडीत मुलीच्या कुटुबियांच्या तक्रारीवरुन या प्रकरणी विविध कलमातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघां नराधमांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वणी पोलीस स्टेशन P.I अनिल बेहरानी यांचा मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.