अजय कंडेवार, Wani :- वणी तालुक्यातील मोहदा येथील ग्राम पंचायत सरपंच वर्षा राजूरकर ,ग्रा.पं.सदस्यगण, महिला बचत गट,अंगणवाडी सेविका व आशा सेविका द्वारा आयोजित हळदी कंकू व संस्कृतीक आणि क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ११मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी त्याच्या कला गुणांना वाव मिळावा रोजच्या दगदगीतून थोडासा आराम आणि मनोरंजन व्हावे म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहदा सरपंच वर्षा राजुकर, उदघाट्क् म्हणून किरणताई देरकर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून SDPO गणेश किंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,महिला बचत गट,तंटामुक्त अध्यक्ष, संगणक परिचालिका हे ही उपस्थित होते.Women rejoice at Mohada; Manmurad rejoices in dancing.Solo, group dance won the hearts of the audience.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व जिजाऊ वंदनाने करण्यात आली.हळदी कुंकू या कार्यक्रमात संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा ,बटाटा रेस , लिंबू चमचा, सिंगल डान्स, ग्रुप डान्स व स्पर्धा वक्तृत्व या सर्व स्पर्धा मोठ्या उत्साहात घेण्यात आलें. त्यानंतर विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना सोयाम तर आभार प्रदर्शन श्रदा मडावी यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,आशा सेविका, जिल्हा परिषद शिक्षिकांनी परिश्रम घेतले ..