Friday, July 10, 2026
HomeBreakingPWD च्या "त्या गेंडूरांना" शिंदेसेनेने दिला "दम"....

PWD च्या “त्या गेंडूरांना” शिंदेसेनेने दिला “दम”….

Ajay,Wani:- वणी शहरातील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल ते नांदेपेरा चौफुलीपर्यंतचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांत गेला असून, रोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. अनेक दिवसांपासून या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेत PWD च्या त्या ” गेंडूरांना” शिंदेसेनेने “दम”…. दिल्याच बोलल्या जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात शहर प्रतिनिधी शिवराज पेचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना यापुढेही दुर्लक्ष झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी दीपक कोकास,धीरज राजूरकर,अनिल उलमाले, अजिंक्य शेंडे, वसुधा ढगे,हिमांशु बोहरा, शुभम गोरे संतोष लक्षेट्टीवार,प्रवीण पिसे, राहुल उपाते, संदीप वाघमारे यांच्यासह आदि शिवसैनिकउपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page