Ajay Kandewar,Wani:-शहरातील हॉटेल आणि लॉज व्यवसाय आता सरळसरळ “लव्हर्स पॉईंट” बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणाने वणी शहर हादरले आहे. नियम, कायदे आणि नैतिकतेला हरताळ फासून काही हॉटेल्समध्ये खुलेआम संशयास्पद व्यवहार सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे, एकाच ओळखपत्रावर वारंवार येणाऱ्या local unmarried कपल्सना कोणतीही चौकशी न करता रूम दिल्या जात आहेत. पण लोकल unmarried couples ला room allow करणे कितपत योग्य, ना तपासणी जणू काही नियमच अस्तित्वात नाहीत. याचा अर्थ थेट असा होतो की,”***** मेरा पेट भरता ना बस ” यामुळे हॉटेल-लॉज व्यवस्थापन थेट संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
या प्रकरणाला अधिक गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा एक पीडित तरुणी पुढे आली. तिच्या म्हणण्यानुसार, संबंधित युवक हा 7 ते 8 वेळा लॉजवर गेला. मात्र आता तो युवक लग्नास स्पष्ट नकार देत आहे. या घटनेमुळे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि “हॉटेल्सची बेफिकिरी”या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत.प्रश्न असा उभा राहतो की,हॉटेल आणि लॉज चालक नेमके कोणते नियम पाळत आहेत?
याहून संतापजनक बाब म्हणजे,एवढे गंभीर प्रकार उघड होत असतानाही पोलिस प्रशासन, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांची भूमिका संशयास्पद शांततेत दिसत आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. शहरातील व बाहेरील हॉटेल-लॉज व्यवसायामागे नेमकं कोणाचं अभय आहे?वसुलीचं जाळं कोण चालवतंय?हे प्रश्न आता उघडपणे विचारले जात असून, उत्तर मात्र कुणाकडेच नाही!
पालकांसाठी सतर्कतेचा काहीं बाबी…
आपली मुलंकुठे जातात, काय बहाणे बनवितात, ट्युशन म्हणून गैरफायदा तर घेत नाही ना…, कोणासोबत वेळ घालवतात याकडे नियमित लक्ष ठेवा,मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवा, जेणेकरून ते मनमोकळेपणाने सर्व सांगतील,मोबाईल व सोशल मीडियाच्या वापरावर योग्य मर्यादा आणि मार्गदर्शन ठेवा,संशयास्पद बदल किंवा वागणूक दिसल्यास त्वरित लक्ष घालून समजून घ्या,मुलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहणे हीच पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

