Ajay kandewar,Wani: वणी शहरातील हॉटेल, खानावळ,लाल चहा टपरी सह अन्य खाद्य पदार्थ विक्रेते राळेगांव शहरात व तालुक्यात सर्रास घरगुती स्वयंपाकासाठी असणाऱ्या लाल रंगाच्या सिलिंडरचाच उपयोग करत असून, व्यवसायिक निळ्या रंगाच्या सिलिंडर चा वापर अगदी अल्प प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सिलिंडर आणि निळ्या सिलिंडर च्या किंमतीत एक हजार रुपयांहून अधिक तफावत असल्याने छोटे मोठे व्यावसायिक सर्रास प्रशासनाच्या, पुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फायदा घेत आहे जिवनावश्यक जिन्नस, सिलिंडर सह अन्य बाबीं चा काळा बाजार होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असते कारण सर्व सामान्य माणसाला सिलिंडर उपलब्ध होत नाही पण व्यवसायिकांना क्षणात मिळते. जास्त रक्कम, विनायास आणि विभाग खिशात असल्यागत हा धंदा सुरु आहे.
वणी शहरात दोन अधिकृत गॅस सिलिंडर एजन्सी असून या व्यतिरिक्त तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध सिलिंडर विक्री केली जात आहे. पुरवठा विभागाने तक्रारी अंती एकही अवैध सिलिंडर विक्री होत असताना पकडले नाही त्या नंतर कारवाई शुन्य. पुरवठा विभागाचा कदाचित समोरील ‘अर्थाजनांचा’ मार्ग सुकर असेल अशीही बोंब आहे.यासह स्वस्त धान्य दुकानातून उचल केलंल धान्य मोठ्या प्रमाणावर खुल्या बाजारात विक्री साठी येतंय या कडे मात्र कायमस्वरुपी पुरवठा निरीक्षक दुर्लक्ष करत असल्याचेही दिसते. लाल सिलिंडर चा वापर होतो आणि नागरिकांच्या नजरेत येतं पण धृतराष्ट्राची भूमिका अंगिकारल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब दिसूं नये हे मात्र न उलगडणारे कोडे चं नाही का? या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे .

