Saturday, May 2, 2026
Homeवणीवणीत तीन दिवसीय संत रविदास जयंती महोत्सव.

वणीत तीन दिवसीय संत रविदास जयंती महोत्सव.

वणी: राष्ट्रीय चर्मकार महासंघ, संत रविदास चर्मकार समाज सुधार मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने 3 दिवसीय संत रविदास जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संत रविदास महाराज प्रबोधन केंद्राचे लोकार्पण, संत रविदास महाराज मूर्ती स्थापना तसेच चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे.त्यानुसार सोमवार दिनांक 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार बाळूभाऊ धानोरकर करतील. यांनतर मनोरंजनातून प्रबोधन ‘भगवानवाणी ‘ सादरकर्ते राष्ट्रीय प्रबोधनकार भगवान गावंडे यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक 14 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता हंसराज भैया अहिर यांच्या अध्यक्षतेखाली संत रविदास महाराज पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक ,व्याख्याते प्रा.जावेद पाशा यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 15 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांनतर लगेच 11 वाजता प्रबोधन केन केंद्राचे उद्घाटक कुणाल चोरडिया आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली मूर्ती स्थापन ,गुणगौरव सोहळा व प्रबोधन केंद्र उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तसेच सायंकाळी शिवाजी,शाहू,फुले, आंबेडकर विचारांचा संगीतमय शाहिरी बाणा पद्मा,सीमा, जॉली प्रस्तुत सादरकर्ते सीमा पाटील,मुंबई यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या नेत्रदीपक 3 दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचा वणी उपविभागातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख संबा वाघमारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे, दौलत वाघमारे, राजू वाघमारे, संदीप वाघमारे, प्रदीप खोब्रागडे, महादेव खंडाळे, प्रकाश राजुरकर, भारत लिपटे, योगेश सोनोने, आशिष डूबे, आकाश डुबे, अक्षय टिकले, संतोष आपटे, संतोष मुळे, मंगेश सोनोने प्रेमिला सोनोने, अंजू बांगडे, पुष्पा खंडाळे, वंदना हांडे, मीनाक्षी दुबे, दिपाली वाघमारे, संगीता येरेकर, प्रिया डुबे, प्रणोती बांगडे, प्रज्ञा इसाळकर, भारती वाघमारे कार्य करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page