Sunday, August 30, 2026
HomeBreakingवणीत काँग्रेस मातीत कसा...?

वणीत काँग्रेस मातीत कसा…?

पदावरून पायउतार होताच " काँग्रेसला निशाणा"? •ऐन निवडणुकीत अनेकांना पक्ष कारवाया करायला लावलेत तेव्हा "काँग्रेस पक्ष मातीत नव्हता"?

Ajay Kandewar,Wani : काही जणांनी “वणी काँग्रेस मातीत गेली” असा प्रचार सुरू केला आहे. पण खरं पाहता, काँग्रेस मातीत गेलेली नाही. उलट ती नव्या जोमाने पुन्हा उभी राहतेय.संजय खाडे यांसारख्या कार्यकर्त्यांनी पक्षात नवसंजीवनी फुंकली आहे. मग प्रश्न असा की काँग्रेस खरोखर मातीत गेली का, की काही गटबाज लोकांनी तसं भासवायचं ठरवलं आहे? ज्या काळात काही नेत्यांनी आपल्या पक्षातीलच कार्यकर्त्यांवर आरोप केले, तेव्हाच काँग्रेसने आपली पायाभरणी मजबूत ठेवली. निवडणुकीच्या वेळी संजय खाडे यांच्यावर झालेल्या आरोपांनी पक्ष कमजोर झाला नाही; उलट त्या घटनांनी लोकांमध्ये चर्चा वाढली, आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.काँग्रेसच्या काही नेत्यांची गटबाजी हीच खरी अडचण आहे. एक गट उभारणीसाठी झटतोय, तर दुसरा फक्त टीकेत रमलाय. जनतेला या गटबाजीचा त्रास होतो. खरं तर, खाडे यांच्या नेतृत्वामुळे पक्ष वाढतो आहे, पण काही जणांना त्यांची वाढ सहन होत नाही.याऐवजी, सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा.“आपण काय करू शकतो काँग्रेससाठी?” कारण मतदारांना भांडणं नकोत; त्यांना विकास हवा. म्हणून आजही सामान्य जनतेच्या आणि सुशिक्षित जनतेचा काँग्रेस पक्षावर गडद विश्वास आहे.काँग्रेस ही केवळ पक्ष नाही तर विचारधारा आहे. काही नेत्यांच्या मतभेदांनी ती ढासळत नाही. आज संजय खाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नव्याने उभी राहत आहे.“काँग्रेस मातीत गेली” असं म्हणणारे विसरतात की ,”माती” हीच ताकद असते; आणि ह्या मातीतूनच वणीत “काँग्रेस” पुन्हा फुलणार आहे.

यवतमाळ जिल्हाध्यक्ष वंदना आवारी यांना डावलणं आणि प्रश्नांची मालिकाच…

यवतमाळ जिल्हाध्यक्ष वंदना आवारी यांना अनेकदा कार्यक्रमात डावललं गेलं, त्यांना शेवटी राजीनामा द्यावा लागला. त्या वेळी काँग्रेस मातीत गेली होती का? नाही .त्या घटनेतूनही कार्यकर्त्यांनी शिकून एकजुटीचं महत्त्व ओळखलं.

 वसंत जिनिंग व वसंत जिनिंगचे वाद पण जनता जागी….

जिनिंगचा निवडणुकीत काँग्रेसच्याच ऍड. देविदास काळे यांच्यावर आशिष ने आरोप केले, पण त्यांनी त्याचं स्पष्ट खंडन करून जनतेचा विश्वास अद्यापही टिकवला. आशिष खुलसंगे यांना अध्यक्षपदावरून पायउतार केलं, त्यातही काँग्रेस नव्हे तर काही “व्यक्तीं” राजकारणाचा बळी ठरला. मग याला “काँग्रेस मातीत गेली” असं म्हणणं म्हणजे वास्तव नाकारणं ठरेल.

• वणी-मारेगाव-झरी क्षेत्र काँग्रेसचा गड……

इतिहास सांगतो की वणी, मारेगाव आणि झरी या भागात काँग्रेसचा पाया आजही घट्ट आहे. कार्यकर्ते आजही झोकून देऊन काम करत आहेत. मग काहींच्या वैयक्तिक मतभेदामुळे संपूर्ण काँग्रेसला दोष देणं योग्य ठरेल का?

संजय खाडे यांच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांत नवा उत्साह…

संजय खाडे यांनी पक्षात नव्या उर्जेचा श्वास भरला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यापासून शैक्षणिक उपक्रमांपर्यंत स्वतःला झोकून दिलं आहे. त्यांच्या कार्यामुळे सामान्य जनता काँग्रेसकडे नव्या नजरेने पाहू लागली आहे. हा पक्ष “मातीत जाणारा” नाही – तर “मातीत गेलेल्यांना उभं करणारा” ठरत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page