Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरातील एका लोकप्रिय सोशल मीडिया ग्रुपवर सोमवारी एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये “बीजेपी भरमार पैसा” असा उल्लेख करत निवडणूक काळात कथित आर्थिक देवाण–घेवाणीचे संकेत देणारा एक पैशाच्या पॉकेटसारखा दिसणारा फोटो ग्रुप वर शेअर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोस्ट व्हायरल होताच शहरात मोठी चर्चा पेटली.हा फोटो खरा आहे का? दावा विश्वसनीय आहे का? पोस्ट करणाऱ्याचा उद्देश काय? — याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तरीदेखील या वादग्रस्त विधानामुळे वणीत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.काहींनी हे निवडणूक काळातील गंभीर आरोप असल्याने तपासाची मागणी केली; तर काहींनी ही पोस्ट भ्रम निर्माण करणारी राजकीय अफवा असल्याचे म्हटले. सोशल मीडियात संपूर्ण दिवस या पोस्टवरून प्रतिक्रियांचा महापूर वाहत राहिला.निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची नोंद होईल का, प्रशासन याची पडताळणी करेल का — याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या एका सोशल मीडियाचा ग्रुप वर “बीजेपी भरमार पैसा” या वादग्रस्त कॅप्शनमुळे वणीच्या निवडणूक रिंगणात नव्या वादळाची सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.

