Monday, May 25, 2026
HomeUncategorizedप्रभाग 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे यांना अव्वल पसंती....

प्रभाग 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे यांना अव्वल पसंती….

Ajay Kandewar,Wani : वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 ‘ब’ मध्ये भाजपचे उमेदवार राजेश्वर उर्फ राजू सुरेश चापडे हे कामाचा माणूस म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. साधेपणा, नम्र वर्तन आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे चापडे यांची प्रतिमा प्रभागात अधिक ठळकपणे उमटत असल्याचे मतदारांमध्ये दिसून येत आहे.

प्रभागात “काम करणारा आणि लोकांसाठी उपलब्ध असणारा चेहरा” ही ओळख राजेश्वर चापडे यांना जोरदार पसंती मिळवून देत आहे.प्रभागात दैनंदिन समस्यांवर त्वरित प्रतिसाद देणारा तरुण नेता म्हणून त्यांचा उल्लेख होत असून, त्यांच्या साधेपणाने अनेकांना आकर्षित केले आहे.प्रभागातील नागरिकांमध्ये वाढत असलेल्या चर्चेनुसार, राजू चापडे यांच्या नावाकडे लोकांचा कल झुकत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. अनेक मतदारांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व, घराघरात पोहोचलेली जनसंपर्कशैली आणि लोकांशी संवाद साधण्याची पद्धत यांचे कौतुक केले आहे.दरम्यान, काही विरोधक केवळ नावापुरते उपस्थित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकू येत असून, त्यांची कामगिरी मतदारांच्या अपेक्षांना पुरेशी नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रभाग 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर चापडे यांच्या प्रभावाची लाट अधिक दृश्यमान होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विशेष म्हणजे,सामान्य घरातून आलेला, साधा, जमिनीवरचा आणि लोकांशी सहज संवाद साधणारा ‘फिरता चेहरा’ म्हणून राजू चापडे हे प्रभागात ठळकपणे उदयाला आले आहेत. युवकांमध्येही त्यांचा प्रभाव वाढलेला दिसत असून, आगामी निवडणुकीत त्यांची बाजू अधिक मजबूत होत असल्याच्या चर्चा जोरात आहेत.प्रभागातील वातावरण पाहता, अनेकांनी “विजयाचं घोडदौड राजेश्वर चापडे यांच्या बाजूने सुरू झाली आहे” अशी प्रतिक्रिया देत सध्याच्या राजकीय समीकरणांना दिशा दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page