•रस्ता रहदारीस ठरत आहे घातक.
•गरोदर स्त्रियांना देखील ऑटोने येणे जाणे झाले कठीण
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील मिनी इंडिया म्हणून समजला जाणारा राजूर……हाच तो राजूर गाव विविधतेत एकता असणारा…याच गावचा अगदी सुरुवातीलाच प्रवेश केला की मोठ मोठें गड्डे…. ऑटोने किंवा दुचाकीने चालताना जणू नरकयातनाच सहन करावं लागत आहे अशी या गावची परिस्थिती….. राजूर फाटा ते राजूर पंचक्रोशीतील गावांत जाण्याच्या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने रहदारीस अडथळा होत आहे तर वे.को.ली. प्रशासन याकडे स्पष्ट दुर्लक्ष करत आहे.Rajur at W.C.L.A vision of the inefficiency of the administration.The road is becoming dangerous for traffic.Pregnant women also found it difficult to come and go by auto.

राजूर गावात इंग्रजांच्या काळापासून कोळसा खाणी आहेत,कालांतराने कॉलरी,इजारा, भांदेवाडा येथे खान निर्माण करण्यात आल्या.या गावातील त्यांच्या क्षेत्रातील विकास कामे करण्याची प्राथमिक जबाबदारी वे.को.ली. प्रशासनाची असताना ते जबाबदारी झटकत आहेत. गावातील त्यांच्या क्षेत्रातील नाल्या, कचरा, श्ट्रिटलाईट हे मूलभूत काम करणे तरी अनिवार्य असताना, परिसरातील कोळसा खाणी रिकाम्या करून “काम झालं माझं,काय करू तुझं…” अशी गत झाली आहे.

वे.को.ली.अधिकारी ,कर्मचारी याच रस्त्याचा खाणीच्या कामाकरीता व रहिदारी साठी या रस्त्याचा वापर करतात.तसेच राजूर पंचक्रोशीतील राजूर, बोदाड, भांदेवाडा, सोनापुर, आकापुर, लाखापुर, नेत असे गाव सुद्धा याच रस्त्याचा वापर करतात.एवढा महत्वाचा रस्ता असताना या खराब रस्त्याची डागडुजीही नाही करीत आहे .हा रस्ता रहदारीस सुरक्षित करून द्यावा अशी मागणीही होत आहे. पन मगरगट्ट हा प्रशासन जणू काही जीवच जाण्याची वाट बघत असल्याचे स्पष्ट चित्र या रस्त्यावरून दिसुन येत आहे.
स्वातंत्र्यासाठी भारत देशातील लोकांना मोठा लढा द्यावा लागला,अशातच स्वातंत्र्योत्तर काळा नंतर भारत सरकारच्या वे.को.ली. प्रशासनाकडून गावच्या पंचक्रोशीतील हक्काचा रस्ता व मूलभूत सुविधा मिळवीण्यासाठी लोकांना लढा द्यावा लागणार का? असा सार्थ प्रश्न निर्माण होत आहे.

