Saturday, October 24, 2026
HomeBreaking Newsभाजपचे महाआरोग्य शिबीर संपन्न ....

भाजपचे महाआरोग्य शिबीर संपन्न ….

महाआरोग्य शिबीराचे संयोजक अँड कुणाल चोरडिया. •१८ रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रवाना,७२५ रुग्णांना दिलासा.

Ajay kandewar,Wani :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत शहरातील बाजोरिया लॉन येथे भाजपा तर्फे आयोजित महाआरोग्य शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले. शिबीराचे संयोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल चोरडिया यांनी केले.

या शिबिरात तब्बल ७२५ रुग्णांनी लाभ घेतला, तर पुढील उपचारासाठी १०३ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. यापैकी १८ रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरातून आवश्यकतेनुसार सर्व उपचार व ऑपरेशन्स विनामूल्य करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार तथा भाजपा नेते संजिवरेड्डी बोदकुरवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, किसान आघाडी प्रमुख दिनकर पावडे, माजी जि.प सदस्य विजय पिदुरकर, जिल्हा ओबीसी अध्यक्ष पवन एकरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे,जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल चोरडिया, शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व महिला नेते उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते “सेवा पंधरवाडा” लोगोचे अनावरण करण्यात आले.

शिबिरात हृदयरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, त्वचारोग अशा विविध तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या. पुढील टप्प्यात रुग्णांची आवश्यक शस्त्रक्रिया देखील परिपूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहे. या शिबिरात डॉ. रोहित चोरडिया यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page