Thursday, October 22, 2026
Homeवणीरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची 36 वी आमसभा उत्साहात संपन्न.

रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची 36 वी आमसभा उत्साहात संपन्न.

•सभासदांना 3 टक्के लाभांश देण्याचा निर्णय, •संस्थेला सातत्याने ‘ऑडिट वर्ग अ’.

Ajay Kandewar,Wani : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी यांची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वसंत जिनिंग हॉल येथे उत्साहात पार पडली. सभेत सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, आर्थिक वर्ष 2024-25 चा अहवाल सादर करण्यात आला.

सभेच्या प्रास्ताविकात संचालक सुरेश बरडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सामाजिक कार्य आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या यशामध्ये सभासद आणि कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले. आमसभेचे विषयवाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार संस्थेला यंदा 2.97 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सभेच्या मान्यतेने सभासदांना 3 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या ठेवींचे प्रमाण सध्या 873.32 कोटी रुपये असून, 21 शाखांद्वारे 91,355 सभासदांना सेवा दिली जात आहे.

संस्थेची स्थापना 1989 मध्ये स्व. भैयाजी पामपट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तर 2002 पासून अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक धोरणे राबवून संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला सातत्याने ‘ऑडिट वर्ग अ’ मिळत आहे.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक चिंतामण आगलावे यांनी केले तर संचालन पायल परांडे यांनी केले. मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहून संस्थेच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सभेच्या माध्यमातून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीला व आर्थिक पारदर्शकतेला नवी दिशा मिळाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page