Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीची तापती रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक ५ मध्ये “निमकर” कुटुंबाच्या बाजूने जनतेचा स्पष्ट झुकाव दिसू लागला आहे. माजी नगरसेवक प्रशांत उर्फ छोटू निमकर यांच्या कार्याचा ठसा पुन्हा एकदा मतदारांच्या मनात दृढ होत असल्याचे चित्र आहे.यंदाच्या निवडणुकीत त्यांची अर्धांगिनी सोनाली प्रशांत उर्फ छोटू निमकर मैदानात उतरल्याने प्रचाराला अनपेक्षित वेग प्राप्त झाला आहे. घराघरांतून एकच आवाज उमटू लागला आहे :“ताई… तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!”
प्रभाग ५ मधील नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “गेल्या काळात छोटू भाऊ यांनी दिलेला आधार, तत्पर सेवा आणि सर्वांसाठी सदैव उपलब्ध असलेली त्यांची उभी साथ विसरता येणारी नाही. म्हणूनच यंदाही आम्हाला ‘निमकर’च पाहिजे!”सोनाली निमकर यांच्या सभ्य, समंजस आणि सर्वसमावेशक प्रतिमेमुळेच जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निमकर कुटुंबाच्या उपस्थितीने प्रभाग ५ मधील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.प्रचाराचा जोम, वाढता जनसमर्थन आणि जनतेची ठाम मागणी यंदाही प्रभाग ५ म्हणतो आहे… “निमकरच पाहिजे”

