Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीत राजीनामे दिलेल्या आठ सदस्यांचं नेमकं ठरलं तरी काय? हा प्रश्न सध्या संपूर्ण गावात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राजीनाम्यांमागचा उद्देश, कारण आणि नेमका टार्गेट काय?याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे “अळीमिळी गुपचिळी”चा संशय अधिकच बळावत आहे.
दरम्यान, विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर येत आहे की, त्या आठ सदस्यांची प्रशासकीय बैठक होणार आहे. या बैठकीत ते सदस्य पुन्हा एकदा राजीनाम्याचं नाट्य करणार की ठोस निर्णय घेणार,याकडे संपूर्ण चिखलगावचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा निर्णय जनतेसाठी असणार की केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी यावरच आजची बैठक निर्णायक ठरणार आहे.राजीनाम्यांचा मुद्दा जर खरंच “विकास” या नावाखाली उभा केला असेल, तर तो विकास नेमका कोणत्या बाबतीत, कुणासाठी आणि कशा पद्धतीने हे आज स्पष्ट होणं अपेक्षित आहे. आठ सदस्यांची भूमिका आज जनतेसमोर उघड होणार असून, “आपलं सा**** की विकास साधला?” या प्रश्नाचं उत्तरही आजच मिळणार आहे अशीही चर्चा सुरू आहे.त्यातच खूप आशेवर चिखलगावकरी आहे. पुढील निर्णय काय होईल?
आजच्या बैठकीत आठ सदस्य काय निर्णय घेतात, तो निर्णय कसा मांडतात आणि जनतेसमोर किती पारदर्शकपणे ठेवतात, यावरच पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निर्णयाकडे आणि विशेषतः त्या आठ सदस्यांच्या प्रत्येक हालचालीकडे चिखलगावकरांची करडी नजर लागलेली आहे.आजचा दिवस चिखलगावसाठी निर्णायक कारण आठ सदस्यांचा खरा उद्देश काय? विकास की आणखी काही? याच उत्तर आजच्या बैठकीतूनच मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

