Wednesday, July 15, 2026
HomeBreaking"भाऊं"चे नुसते बोलणे नाही, थेट काम....!

“भाऊं”चे नुसते बोलणे नाही, थेट काम….!

Ajay Kandewar, Wani : दामले फैलात विकास कामे कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरू शकतात, हे माजी नगरसेवक छोटू उर्फ प्रशांत निमकर यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. “मतदारांनी सोनाली निमकर यांच्यावर दाखवलेला विश्वास शब्दांत नाही, कामातून फेडायचा” या भूमिकेतून दामले फैलात विकास कामाला थेट शुभारंभ झाला आहे.

विशेष म्हणजे छोटू निमकर यांच्या पत्नी सोनाली निमकर नगरसेवक म्हणून निवडून येताच अवघ्या पहिल्याच आठवड्यात विकासाचा धडाका सुरू झाला. नगरपरिषदेत शपथ घेतल्याबरोबर दामले फैलातील पाणीटंचाईचा ज्वलंत प्रश्न हाती घेत ट्यूबवेल बोर मारून दामलेवासीयांचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. निवडणूक संपली, आश्वासनं विसरली असा अनुभव अनेकांना असतो; मात्र निमकर दाम्पत्याने याला छेद देत कृतीतून विश्वास जपला आहे.

दामले फैलात भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या सोनाली निमकर यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा छोटू उर्फ प्रशांत निमकर यांच्या कार्यपद्धतीवरचा शिक्काच मानला जात आहे. शब्द अखेर पूर्ण करत “काम आधी, प्रचार नंतर” ही ओळख पुन्हा एकदा ठसठशीत झाली आहे. दामले फैलात विकासाची सुरुवात ही केवळ एक काम नाही, तर पुढील व्यापक विकासाचा स्पष्ट संकेत मानला जात आहे.या विकासकामाच्या प्रसंगी नगराध्यक्ष विद्या आत्राम,माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहर प्रमुख ॲड. निलेश चौधरी, माजी नगरसेवक छोटू उर्फ प्रशांत निमकर, नवनियुक्त नगरसेवक सोनाली निमकर, रितिक मामिडवार यांची उपस्थिती होती.दामले फैलात आज जी विकासाची चळवळ दिसते आहे, ती छोटू उर्फ प्रशांत निमकर यांच्या ठाम नेतृत्वाची आणि कामगिरीची साक्ष देणारी ठरते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page